बस चालकाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

गाडेगाव येथे बस नेण्यास चालकाची टाळाटाळ, पालक संतप्त

भास्कर राऊत, मारेगाव: शाळकरी विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी असलेल्या मानव मिशनच्या बसेस केवळ चालकांच्या मनमानीने काही गावांमध्ये पोहचत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविषयी वरिष्ठांकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप पालक करीत आहे.

बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्यासाठी गैरसोय होऊ नये, त्यांना शाळा घरापासून दूर वाटू नये यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी मानव मिशनच्या बसेस सुरु केल्या. गावातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हार्दिक यामागचा उद्देश आहे. मागील काही वर्षांपासून शासन ही सेवा अव्याहतपणे पुरवीत आहे.

अशातच मार्डी येथेही आदर्श हायस्कूल तथा उच्च माध्यमिक कॉलेजच्या मुलींसाठी अशीच बस काही वर्षांपासून सुरु आहे. मार्डी येथून किन्हाळा, मजरा-गाडेगाव, बोदाड- केगांव, खैरगाव- चिंचमंडळ या मार्गाने बसेस मुलींसाठी ये जा करीत असतात. यातील गाडेगाव येथे एकदा बस चिखलामध्ये गेली होती. परंतु ग्रामपंचायतने त्याठिकाणी मुरूम टाकून बस पलटवण्याची व्यवस्था केली. परंतु काही चालक हे बस पलटवायची जागा असूनही बस नेत नाही.

त्यातही ज्या गावाला सकाळी कॉलेजची बस जाऊन येते त्याचठिकाणी हायस्कुलची बस नेत नसल्याने वाहनचालकाच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सकाळची बस बिनदिक्कतपणे जाऊन येते पण दुपारच्या शाळेची बस त्याच गावाला नेत नसल्याने आणि याविषयी वाहनचालकाला विचारणा केली असता उलट उत्तर देत असल्याने पालक वर्गामध्ये संताप व्यक्त केल्या जात आहेत.

याविषयी वणी येथील कार्यालयात प्रमुखांशी संपर्क साधला असता तेही याचे समर्थन करीत आहे. मागील 8 ते 10 दिवसांपासून गाडेगाव येथील बस बंद असल्याने आणि रूटवर मात्र ही गावे असल्याने याबाबतीतही संशयाचे वातावरण निर्माण झाले असून भ्रमनध्वनी केल्यास योग्य उत्तर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा: 

पूर अपडेट्स: पुराचे पाणी ओसरायला सुरवात, काही गावांचा संपर्क पूर्ववत

निर्गुडा नदीच्या पुलावर ट्रकला भीषण अपघात, कठडे तोडून ट्रक कोसळला नदीत

वणीत ‘कोकोलॅन्ड’ मॉकटेल बारचे थाटात उद्घाटन

Comments are closed.