पूर अपडेट्स: पुराचे पाणी ओसरायला सुरवात, काही गावांचा संपर्क पूर्ववत

पुरामुळे तुरीचे प्रचंड नुकसान... चौबार पेरणीचे संकट, शेतकरी हवालदिल..... संध्याकाळपासून पाटाळ्याचा पूल सुरू होण्याची शक्यता

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या गावांना आज दिलासा मिळाला आहे. पुराचे पाणी बुधवारी रात्रीपासून ओसरायला सुरूवात झाली असून काही गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. तर उर्वरित गावांचा दुपार पर्यंत पूर्ववत होऊ शकतो. गेल्या तीन दिवासांपासून पाण्याखाली असलेल्या पाटाळ्याच्या पुलावरील पाणी देखील आता ओसरले आहे. सध्या या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. सलग तिस-यांदा आलेल्या पुरामुळे तालुक्यातील शेतक-यांचे चांगलेच नुकसान झाले आहेत. वर्धा नदीकाठावरील शेतशिवारात असलेल्या तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.

शनिवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला होता. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली. मात्र धरणाचे पाणी सोडल्याने वर्धा नदीकाठावरील गावांना पुराचा वेढा होता. बुधवारी रात्रीपासून भुरकी परिसरातील पुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली. आज गुरुवारी दिनांक 15 सप्टेेबर रोजी सकाळ पासून या गावाचा मार्ग खुला झाला. तर शेलू गावात सकाळी तीन फूट पाणी होते. हे पाणी देखील झपाट्याने ओसरत असून  दुपार पासून या गावाचा संपर्क पूर्ववत होईल. कवडशी येथील पाणी सकाळपासून ओसरायला सुरवात झाली आहे. दुपारपर्यंत या गावाचा संपर्क पूर्ववत होणार आहे.

संध्याकाळपासून पाटाळ्याचा पूल सुरू होण्याची शक्यता
बुधवारी रात्री पाटाळ्याच्या पुलावरील पाणी ओसरले. सध्या पाटाळ्याच्या पुलावर डागडुचीचे काम सुरू आहे. मात्र सातत्याने पूल पाण्याखाली जात असल्याने सध्या या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा पूल सध्या वाहतुकीसाठी संपूर्णत: बंद आहे. संध्याकाळपासून या मार्गावरून वाहतूक देखील सुरळीत होणार असल्याची माहिती आहे. या मार्ग बंद असल्याने वरोरा, नागपूर येथे जाणा-यांना चांगलाच फटका बसला आहे.

पाटाळ्याच्या पुलावर सध्या डागडुजी सुरू

चौबार पेरणीचे संकट, शेतकरी हवालदिल…
वर्धा नदीला आलेल्या दोन दा पुरामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे तिबार पेरणीच्या वेळी उशिरा पेरणी म्हणून वर्धा नदीकाठावरील इत्यादी भागातील शेतक-यांनी तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. तर काही प्रमाणात कपाशीचीही लागवड झाली होती. मात्र तिस-यांदा आलेल्या पुरामुळे वर्धा नदीकाठावरील शेलू, भुरकी इत्यादी शेतशिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी पशूधनाचे नुकसान झालेले नाही. मात्र पुरामुळे चा-याचे संकट शेतक-यांपुढे निर्माण झाले आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा लवकरच पंचनामा होणार असल्याची माहिती आहे. (व्हिडीओ – भुरकी गावातील शेतीची परिस्थिती)

भूरकी गावाचे पूनर्वसन कधी होणार?
वणी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पावसाळ्यात सलग तीनदा नदीला पूर आला आहे. सातत्याने पुराचा फटका बसत असल्याने भुरकी गावातील रहिवाशी आता त्रस्त झाले आहेत. पुरामुळे त्यांचे सातत्याने नुकसान होत आहे. त्यामुळे या गावातील रहिवाशांनी पूनर्वसनाची मागणी लावून धरली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे. तसेच मुख्यमंत्री यांना देखील फॅक्स केला आहे. सततच्या पूरपरिस्थितीमुळे गावकरी त्रस्त झाले असून यात मोठ्या प्रमाणात गावाक-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी गावातील सरपंच सीमा हरिश्चंद्र बदकी, उपसरपंच तसेच गावक-यांनी केली आहे. (व्हिडीओ – भुरकी गावातील पूर परिस्थिती)

हे देखील वाचा: 

पूर अपडेट्स: पुराचे पाणी ओसरायला सुरवात, काही गावांचा संपर्क पूर्ववत

निर्गुडा नदीच्या पुलावर ट्रकला भीषण अपघात, कठडे तोडून ट्रक कोसळला नदीत

वणीत ‘कोकोलॅन्ड’ मॉकटेल बारचे थाटात उद्घाटन

अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

Comments are closed.