जल्लोषात पार पडला ‘एक शाम देश के नाम’ कार्यक्रम

देशभक्ती गुंजले सभागृह, 'पीपल्स हिरो' पुरस्काराने सेवाभावी व्यक्तींचा सन्मान

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील श्रीविनायक येथे सोमवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य देशभक्तीपर कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कार्यक्रमातील विविध देशभक्तीपर गाण्याने व नृत्यांनी प्रेक्षकांना रिझवले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम इत्यादी जय घोषांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेला. कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारी, शहिदांना संगीतमय मानवंदना दिली गेली. दरम्यान वणीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या सेवावाभी व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जय श्री कृष्ण जन्माष्टमी समिती द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जन्माष्टमी निमित्त 19 ऑगस्ट पर्यंत वणीत विविध कार्यक्रमांचे रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाला वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया यांनी केले आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चोरडिया यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. नवीन जन्माष्टमी समितीच्या सदस्यांचा परिचय करून देत त्यांनी तरुण रक्तांनी आता ही धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी असे आवाहन केले. ज्येष्ठ व माजी पदाधिका-यांचे मार्गदर्शन नवीन समितीला कायम राहणार असून भविष्यात जन्माष्टमी विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करावे, असे आवाहनही विजय चोरडिया यांनी समितीला केले.

कार्यक्रमाला अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम या भक्तीगीताने सुरूवात झाली. त्यानंतर जहां डाल डाल पर, मेरे देश की धरती, हर करम अपना करेंगे, देखो विर जवानो, सुनो गौर से दुनिया वालो, ताकद वतन से इत्यादी देशभक्तीपर गाण्याने संपूर्ण सभागृह गुंजला. यावेळी वणीतील सुप्रसिद्ध गायक व ना. तहसिलदार विवेक पांडे यांनी सादर केलेले संदेसे आते है या गाण्याने प्रेक्षकांना चांगलेच भावूक केले. अनेक गाण्याला प्रेक्षकांनीही ठेका धरला. कार्यक्रमात राधा-कृष्णाच्या केलेल्या तीन जोड्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. गोविंदा आला रे आला या गाण्यात या जोड्यांचे स्वागत करण्यात आले.

‘पीपल्स हिरो’ पुरस्काराने सन्मान
कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रशासकीय, कायदा व सुव्यवस्था, कला, खेळ, संस्कृती, पर्यावरण, आर्थिक, महिला सबलीकरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणा-या व्यक्तींचा ‘पीपल्स हिरो’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. शरद जावळे, अभिजित वायकोस, निखिल धुळधर, विवेक पांडे, अशोक जी सोनटक्के, दिलीप मालेकर, राकेश खुराना, शेखर वांढरे, मंगला झिलपे, डॉ. विवेक गोफने, किरण दिकुंडवार, राम धुन परिवार, सतीश पिंपळे, मुन्ना महाराज तुगनायत, पवन एकरे, दिलीप कोरपेनवार, बाळ सरपटवार, राजाभाऊ पाथ्रटकर इत्यादींचा कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

देशसेवेसाठी कायम तत्पर राहू – ऍड कुणाल चोरडिया
थोरांमोठ्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही तरुणांनी जन्माष्टमी समितीची धुरा अंगावर घेतली आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या व सल्लागार समितीच्या मार्गदर्शनात आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. कोणत्याही सामाजिक, धार्मिक आणि देशसेवेच्या कार्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू. यापुढेही असेच कार्यक्रम जन्माष्टमी समितीतर्फे आम्ही आयोजित करणार आहोत. वणीकरांनी असे प्रेम आमच्या पाठिशी राहू द्यावे.
– ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया, अध्यक्ष जय श्री कृष्ण जन्माष्टमी समिती

जन्माष्टमी महोत्सवातील आज होणारे कार्यक्रम: 
आज मंगळवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहे. यात दुपारी 1 वाजता चिमुकल्यांसाठी कृष्ण दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा 1 ते 5 या वयोगटासाठी आहे. दुपारी 2 वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. महाभारतातील पात्र या विषयावर ही स्पर्धा आहे. वय वर्ष 5 ते 12 आणि 12 वर्षापुढील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दुपारी 3 वाजता पूजा थाली सजावट स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यात पूजेची थाली घरून सजवून आणायची आहे.

दुपारी 4 वाजता 1 मिनिट स्पर्धा, अंदाज बांधणे स्पर्धा, हाऊजी, लकी लेडी, लकी चाईल्ड, बेस्ट ड्रेस चाईल्ड या स्पर्धा घेतल्या जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या दिवसाचे प्रमुख आकर्षण असलेला जागरण कार्यक्रम होणार आहे. नागपूर येथील जय बजरंगी जागरण गृप व कोमल निनावे या हा कार्यक्रम सादर करणार आहे.

19 ऑगस्ट पर्यंत चालणा-या विविध कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीद्वारा करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर गोयनका-उपाध्यक्ष, हितेश गोडे -उपाध्यक्ष, सागर जाधव – सचिव, अमोल धानोरकर – सहसचिव, सचिन क्षीरसागर – कोषाध्यक्ष, राजू रिंगोले – सह कोषाध्यक्ष, पियूष चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, मयूर गेडाम – सह, प्रसिद्धी प्रमुख, रितेश फेरवाणी – कार्याध्यक्ष, शुभम मदान – सह कार्याध्यक्ष यांच्यासह

आशुतोष पोद्दार, सागर मदान, राजू अडपल्लीवार, कपिल कुंटलवार, मंगेश घोटकर, राज चौधरी, निखिल गोहने, बिट्टू खडसे, निखिल मारखंडे, संकेत रेभे, विनोद खडसे, रोशन जाधव, संदीप जुनघरे, गोविंदा नरपांडे, प्रकाश व-हाटे, विलास आवारी, योगेश आवारी इत्यादी परिश्रम घेत आहे.

हे देखील वाचा:

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

Comments are closed.