आजाराला कंटाळून वृद्धेने घेतली विहिरीत उडी

मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सगणापूर येथील सुमन दिनकर चौधरी (६८) या वृद्धेने पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ जानेवारीच्या दुपारी साडेतीन वाजे दरम्यान घडली. सुमन चौधरी यांना अनेक दिवसांपासून पोटाचा त्रास होता. सेवाग्राम येथे त्यांचेवर उपचार सुरू होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार होती. परंतु शस्त्रक्रिया होण्याअगोदरच त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांना दोन विवाहित मुले, मुली आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.