मारेगाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच पदाची निवड शांततेत
22 फेब्रुवारीला उर्वरित ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचाची निवड
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये निवडुन आलेल्या सदस्यां मधुन सरपंच- उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.
तालुक्यात 31 ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या.यापैकी 15 ग्रामपंचायत मध्ये निवडुन आलेल्या नवनिर्वाचित सदस्यां मधुन सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया 18 फेब्रुवारी रोजी पार पडली.तर उर्वरित ग्राम पंचायत ची 22 फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया होणार आहे.तालुका निवडणुक निर्णय अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रियेत मजरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शोभा सुधाकर बोबडे यांची तर उपसरपंच पदी अशोक महादेव देऊळकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. चोपन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शारदा संजय गोहोकार तर उपसरपंचपदी अजय नारायण आसुटकर, खैरगाव (बुट्टी)ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंदु जवादे तर उपसरपंचपदी निलिमा गेडाम, चिंचमंडळ सरपंच पदी वैशाली तुळशिराम परचाके यांची तर उपसरपंचपदी प्रफुल्ल तुकाराम विखनकर. देवाळा सरपंचपदी रूख्मा कोयचाडे तर उपसरपंचपदी सुरेश लांडे.
किन्हाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभम भोयर तर उपसरपंचपदी प्रशांत तोरे, नरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता रामक्रुष्ण मरसकोल्हे तर उपसरपंचपदी यादव पांडुरंग पांडे, पिसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा मेश्राम तर उपसरपंचपदी मिनाक्षी दिगांबर, बोरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा चिकराम तर उपसरपंचपदी सुधाकर खिरटकर, केगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जया ढाले तर उपसरपंचपदी रोशन कांबळे.
सिंधी महागाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलीमा थेरे तर उपसरपंचपदी अविनाश लांबट,सावंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अभिजित मांडेकर तर उपसरपंचपदी मेघराज ताजणे, गाडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निता खंडाळकर तर उपसरपंचपदी नामदेव जुमनाके .पहापळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावबा आत्राम तर उपसरपंचपदी शोभा नांदे बहुमताने विजयी झाले तसेच चिंचाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपद हे रिक्त असुन उपसरपंचपदी शशिकांत तावाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: