बांधकाम साईडवर ठेवलेले 60 हजाराचे वायर बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. येथील नांदेपेरा चौफुली बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान चोरीची ही घटना घडली. याबाबत फिर्यादी घरमालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार येथील रवीनगर भागात वास्तव्यास असलेले महेंद्र कवडूजी चहाणकर यांचे नांदेपेरा चौफुली येथील प्लॉट क्र. 1 वर घराचे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य त्यांनी एका खोलीत आणून ठेवले होते. फिर्यादी गुरुवार 31 ऑगस्ट रोजी बांधकाम ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना साहित्य ठेवलेल्या खोलीचा दार उघडा दिसला.

संशय आल्यामुळे त्यांनी खोलीत जाऊन सामानाची तपासणी केली. तेव्हा आर.आर. कंपनीचे 25 mmचे वायर बंडल किंमत 25 हजार, 10mm वायर 90 मीटर किमत 7 हजार 980 रु., 6 mm फिनोलेक्स कंपनीचे 2 वायर बंडल 20360 रु., 4 mm च्या फिनोलेक्स कंपनीचे 2 वायर बंडल किमत 6480 रु. असे एकूण 60 हजार 180 रुपयाचे इलेक्ट्रिक वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून पडले. फिर्यादीच्या तक्रारवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द कलम 380, 461 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे मार्गदर्शनात दिगांबर किनाके करीत आहे.

Comments are closed.