वणीत विजबिलाची होळी, विज वितरण कंपनीला निवेदन

वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत विदर्भ जनआंदोलन समितीच्या वतीने विज बील जलाओ आंदोलन करण्यात आले. वणी महावितरण कार्यलयाच्या समोर 27 जुलै ला दुपारी 12 वाजता वीजबिल जाळून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य सरकारचा प्रती युनीट केवळ अडीच रुपये विज निर्मीतीचा खर्च असताना जनता व उद्योगांकडून तिप्पट-चौपट भावाने वसूलीचा हा गोरखधंदा बंद करावा. विदर्भातील कोळसा वापरुन आम्हाला प्रदुषणाचे दुष्परिणाम भोगायला लावणाऱ्या सरकारने तातडीने विदर्भातील सर्वाचे लॉकडाऊन काळातील वीज माफ करुन दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय घ्यावा. या मागणीबाबत सरकारने जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असे प्रतिपादन माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी केले.

या आंदोलनात पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, देवराव धांडे, संजय चिंचोळकर, बाळासाहेब राजूरकर, रुद्रा कुचनकर, राहुल खारकर, आकाश सूर, राहुल खिरटकर, सृजन गौरकर, दशरथ पाटील, राजू पिंपळकर, बालाजी काकडे, नारायण काकडे, राहुल झट्टे, मंगेश रासेकर, प्रीतम मत्ते, मंगेश डोंगे, होमदेव कन्नके, शैलेश गुंजेकर, आनंदराव पांनघाटे, उद्धव हेपट, अनिल चटप, पुरुषोत्तम निमकर, पुंडलिक पथाडे, खुशाल कामरे, अलका मेवाडे, सुषमा मोडक, भाऊराव लखमापुरे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे, यापुढे दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, शेतीपंपाचे थकीत वीजबिल माफ करावे, वीज निर्मीतीच्या उत्पादन खर्चानुसार म्हणजे सध्याच्या निम्मे वीजबिल आकारणी करावी, लोडशेडींग संपवून पूर्ण दाबाची व पूर्ण वेळ वीज द्यावी, इत्यादी प्रमुख मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना पाठविण्यासाठी विद्यूत उपअभियंता वणी यांना देण्यात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी वीज बिल माफ करण्यासह इतर मागण्यांविषयी जोरदार घोषणा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.