दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

'ही' विद्यार्थीनी तालुक्यातून आली प्रथम

0

जितेंद्र कोठारी, वणी:राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. अमरावती विभाग अंतर्गत वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेच्या कु. रजिया मन्सूर शेख या विद्यार्थिनीने 97.60 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात अव्वल ठरली आहे. तर एसपीएम शाळेची कु. कनिष्का जिवणे व जनता माध्यमिक शाळा वणी येथील कु. स्मिता नेताजी ताजणे या दोन विद्यार्थीनींनी 96.80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. वणी तालुक्यातील 43 शाळेतील 2614 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी 2447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

जनता विद्यालय वणी येथून स्मिता नेताजी ताजणे 96.80% गुण घेऊन शाळेतून व तालुक्यातून द्वितीय आली आहे. तर संस्कृती गालेवार आणि समीप पिंपळकर यांनी 95.40% गुण घेत शाळेतून द्वितीय आले आहेत. तर साक्षी माथनकर हीने 95.20% गुण घेत शाळेतून तिसरी आली आहे. विवेकानंद विद्यालय वणी येथून निवेदिता सदानंद इंगोले ही 92.80 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. तर मोक्षांत प्रशांत लेनगुळे हा 91.80 टक्के गुण घेऊन दुसरा तर पुष्कर किशोर सहारे हा 90.80 टक्के गुण घेऊन तिसरा आला आहे.

लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूलचा शिव विवेक देशपांडे या विद्यार्थ्याने 94.40% गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर रिया सुनील मुणोत 93.40% गुण घेत द्वितीय तर वैभवी गजानन राठोड ही विद्यार्थीनी 93.00% गुण घेत शाळेतून तृतिय आली आहे. नुसाबाई चोपणे विद्यालयातून कु. आचल विजय पत्रकार 87.80% गुण घेऊन प्रथम, कु. रेणुका सुनील ताजने 87.20% ही द्वितीय तर कु. मंजुषा विठ्ठल चिकाटे 80.00% गुण घेऊन तृतिय आली आहे.

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय वणी येथील अंजुमतारा वजीर अंसारी 86% टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम, साजिया शब्बीर खान ही 81.40% गुण घेऊन द्वितीय तर अल्फिया शब्बीर खान 81% गुण घेत तिने तृतिय क्रमांक पटकावला आहे. आदर्श विद्यालय, वणी येथील सानिया शेख हि 84.40% गुण घेत शाळेतून अव्वल आली आहे. चैताली पोतराजे 81.40% शाळेतून दुसरी तर अन्सारी आफरिन नुसरत हुसेन हीने 80.80% गुण घेत शाळेतून तिसरी आली आहे.

11 शाळांचा निकाल 100 टक्के
वणी तालुक्यातील वणी, घोंसा, उकणी, कुरई, साखरा (को.), नेरड, शिरपूर, वेळाबाई, नांदेपेरा, राजूर (का.), कायर, सावरला, शिंदोला, साखरा (दरा), पेटूर, भालर, ब्राह्मणी, मारेगाव (को.), परमडोह, मंदर, कळमना, तेजापूर, मोहोर्ली, मेंढोली, बोर्डा, वांजरी, मूर्धोनी, नायगांव, परसोडा येथील 43 शाळांपैकी आदर्श हायस्कुल शिंदोला, तुकडोजी महाराज हायस्कूल भालर, भास्करराव ताजने विद्यालय कळमना, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा, वणी पब्लिक स्कुल वणी, जगन्नाथबाबा विद्यालय वांजरी, स्व. के.एन. कातकडे माध्य. शाळा चिखलगाव, साईकृपा माध्य. विद्यालय मूर्धोनी, श्री जगन्नाथ महाराज विद्यालय, राजकीय अनु. जाती मुलांची निवासी शाळा परसोडा आणि न्यु व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल वणी या 11 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

गेल्या वर्षी 10 वीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र कोविड 19 आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा निकालासाठी तब्बल 50 दिवस अधिक प्रतीक्षा करावी लागली. कोरोना प्रादुर्भावमुळे दहावीची भूगोल विषयाची शेवटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयात विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.