वणीतील महात्मा फुले चौकात घाणीचे साम्राज्य
अवस्चछतेमुळे फलकामागेच डुकरांचा सुळसुळाट त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
जब्बार चीनी, वणी: शहरातील महात्मा फुले चौकात फलकामागेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तिथे डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत नगरपालिकेकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, जातीभेद व दिनदलित, बहुजनांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राचा फलक प्रभाग क्रमांक 6 (वार्ड क्रमांक 21) मध्ये लावला आहे. हा परिसर महात्मा फुले चौक म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या या फलकामागेच घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. परिणामी इथे डुकरांचा सुळसुळाट झाला आहे.
याबाबत अनेकदा परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांकडे तोंडी तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर याबाबत शासनाच्या आपले सरकार या ऍपवरून नगरपालिकेकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली मात्र त्यानंतही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
थोर समाजसुधारकांच्या कार्याची ही एक प्रकारे विटंबनाच असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तरी लवकरात लवकर यावर कार्यवाही न केल्यास आंदोलन उभारले जाईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
हे देखील वाचलंत का?