कर्मचा-याची खोलीत रासलीला ? ग्रामस्थांनी दिला चोप

परिसरात खमंग चर्चेला उधाण

0 1,905

सुशील ओझा, झरी: शासकीय काम सोडून महिलेसोबत खोलीत असलेल्या ‘त्या’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला कोंडण्यात आल्याची घटना झरी येथे घडली. रासलीलेची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले. तक्रारीअभावी बयाण घेऊन सोडून देण्यात आले. मात्र या प्रकरणाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.

झरी तालुका आदिवासी बहुल आहे. याठिकाणी सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बँकासुद्घा आहे. त्यामुळे विविध कामांसाठी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व सर्वसामान्य जनता याठिकाणी येते. परंतु अशिक्षित जनतेची दिशाभूल करून त्यांना लुटण्याचा प्रकार काही कार्यालयामध्ये सुरू आहे. शासकीय, बँक कर्ज व इतर कामे करून देण्याच्या नाखाली गोरगरीब नागरिक तसेच महिलांना सुद्धा लुबाडण्यात येत आहे. त्यांच्या अज्ञानाचा आणि गरजेचा फायदा उचलला जात आहे. असाच काहीसा प्रकार झरी येथे काल बुधवारी दुपारच्या सुमारास घडला.

एका कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने आपल्या खोलीवर दोन महिलांना नेऊन दरवाजा बंद केला. याबाबतची कुणकुण गावातील काही तरुणांना मिळाली. त्यानंतर खोलीत रासलीला सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्या कर्मचाऱ्याला चोप देऊन दोन्ही महिलांसह खोलीत कोंडले. यावेळी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी खोलीतील कर्मचाऱ्यांसह दोन महिलांना वाहनात बसवून पोलीस स्टेशनला आणले. ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी सदर महिला व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यावेळी महिलेने शासकीय कामाकरिता आल्याचे बयाण लिहून दिले. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले.

परिसरात खमंग चर्चेला उधाण
कार्यालयीन वेळेत शासकीय कामं सोडून कर्मचारी खोलीवर कशासाठी आला होता. त्या दोन महिलांना खोलीवर आणून कर्मचा-याने कोणते शासकीय काम केले, असे अनेक प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित केले जात आहे. गोरगरीब महिलांना काम देण्याच्या आमिष दाखवून गैरकृत्य करण्याचा प्रताप तर हा कर्मचारी करत नव्हता ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Loading...