उपोषणकर्त्यांची थेट आयजी कडे तक्रार

आज उपोषणाचा पाचवा दिवस

0 555
विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी यवतमाळ येथे विविध आदिवासी व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जिल्हा अधिक्षक कार्यालया समोर, तिरंगा चौक येथे सोमवारी दिनांक ०८ जुलै पासून आमरण उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असला तरी अद्याप या उपोषणाची पोलीस प्रशासनाने दखल देतलली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी याची तक्रार थेट पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
सुरपाम यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तसेच धीरज तिराणकार याचा देखील खून झाला असून पोलीस त्या प्रकरणाकडेही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
यात वणी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल धुर्वे यांच्यासह गीत घोष, संतोष चांदेकर, सुरेश तिराणकार, संतोष पेंदोर, भाष्कर तिराणकार, राजु पोयाम, मनिष तिराणकार, बंडु सिडाम, गजु मडावी, मंगेश कोकाटे, बोन्शा सुरपाम, लक्ष्मीबाई सुरपाम व अशोक सुरपाम यांचा समावेश आहे.
Comments
Loading...