सुवर्ण संधी – मनसे देणार पाच हजार युवक युवतींना रोजगार

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदार संघात बेरोजगारी एक मोठी समस्या आहे. शिक्षित, पदवीधर आणि कौशल्य असूनही योग्य मार्गदर्शन आणि संधीच्या अभावी तरुण तरुणीच्या हाताला योग्यतेनुसार काम मिळत नाही. स्थानिक उद्योगांमध्येसुद्धा भूमिपुत्रांना नोकरीसाठी आंदोलने कराव लागतात. वणी उप विभागात बेरोजगारीची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आता तब्बल 5 हजार तरुणांना विविध क्षेत्रात नोकरी देण्याचा बीडा उचलला आहे. यासाठी मनसे नेता राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून 3 डिसेंबर रोजी वणी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत मनसे कार्यालय शिवमुद्रा येथे शनिवार 16 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत राजू उम्बरकर यांनी माहिती दिली. वणी उप विभागातील 50 हून अधिक मुख्य गावात मोफत मार्गदर्शन, अर्ज नोंदणी व मुलाखत पूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे. 21 सप्टेंबर पासून अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. अर्जाची छाननी व इतर प्रक्रिया पूर्ण करून 3 डिसेंबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या मेळाव्यात 80 पेक्षा अधिक उद्योग, सेवा, आणि कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहे. मेळाव्यात अर्ज नोंदणी केलेल्या उमेदवाराची थेट मुलाखत घेऊन पात्र उमेदवाराला तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणा आहे. तसेच क्यूआर कोड व लिंकद्वारे मेळाव्या संदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाईल. नोकरीसाठी मुलाखत देताना आत्मविश्वास, शरीराची हालचाली, मुलाखतकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर कशा द्यावा व इतर बारकावे बाबत मुलाखत पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यात वणी विधानसभा क्षेत्रातील नोकरी इच्छुक तरुण तरुणींना समान प्राधान्य देण्यात आला आहे. तरी दहावी, बारावी उतीर्ण, ग्रेज्युएट, पोस्ट ग्रेज्युएट, पदवीधर असलेले बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उम्बरकर यांनी केला आहे.

Comments are closed.