12 हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

80 अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत चालला जेसीबी

0

सुशील ओझा, झरी: पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र मुकूटबन येथील नियतक्षेत्र पवनार कक्ष क्रमांक 28 मध्ये काही लोकांनी अनेक दिवसांपासून 12 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करून त्यावर शेती करीत होते. या अतिक्रमीत जमिनीच्या दस्तावेज बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्याने विचारपूस केली असता अतिक्रमण केलेल्या लोकांजवळ कोणत्याही प्रकारचे दस्तावेज नव्हते.

12 जून रोजी पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक के एम अर्भना यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत एकूण 80 अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता त्यात सहावनसंरक्षक अजय गजभिये वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, विक्रांत खाडे, माधव आडे, संगीता कोकणे, एस बी मेहरे, तुळशीराम साळुंके, रुपेश खेडकर सह इतर अधिकारी कर्मचारी होते.

12 हेक्टर जमिनीवरील संपूर्ण अतिक्रमन दोन जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणेदार धर्मा सोनुने, सुलभ उईके ,पुरुषोत्तम घोडाम, नीरज पातूरकर सह इतर कर्मचारी बंदोबस्त करीत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.