आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

शिवसैनिकांतर्फे गरजूंना भोजनदान व आर्थिक मदत

0

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे पर्यटन राज्य मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांतर्फे वणीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना भोजन वाटप तथा गरजूंना रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली. त्यानंतर शहरातील रस्त्यांवर उपाशी पोटी असलेल्या, निराधार व गरीब लोकांना भोजन वाटप करण्यात आले. आदित्या ठाकरे यांनी कोरोनामुळे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केल्यामुळे सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत साध्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना वणी शहर प्रमुख राजू तूराणकर, युवा सेना तालुका चिटणीस अजिंक्य शेंडे यांचेतर्फे करण्यात आले.

यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दीपक कोकास, शिवसेना विधानसभा संघटक सुनील कातक्डे, महेश पहापळे माजीयुवा सेना शहर संघटक, मंगल भोंगळे विभाग प्रमुख, निखिल तूराणकर शाखा प्रमुख, जनार्दन थेटे शाखा प्रमुख, सचिन ठावरी शाखा प्रमुख, मिलिंद बावणे, गोलू सिडाम, श्रीकांत सुतसोनकर, राहुल गावंडे, स्वप्नील थेरे, अभिषेक माटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.