मारेगावात इंग्रजी कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद
एम एस दास यांच्या शिकवणीनं जिंकलं प्रशिक्षणार्थ्यांचं मन
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावातील राष्ट्रीय विद्यालयात स्वामी विवेकानंद अभ्यासिके तर्फे एक दिवसीय इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यात विद्यार्थी व इतरांनी सहभाग नोंदवून भरभरुन प्रतिसाद दिला. स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतात. इथले आजपर्यंत वीस ते बावीस विद्यार्थी कठोर परिश्रम करुन शासकिय नोकरीला लागले असुन. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा व्हावा, त्यांची इंग्रजी भाषा मजबुत व्हावी यासाठी या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यशाळेत शहर व तालुक्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. सुमारे चार तास ही कार्यशाळा चालली. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रवीण खंडाळकर, कपिल श्रृंगारे, गजानन नरवाडे तसेच विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.