राजूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गरजूंना मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी, वणीची मदत

0

बहुगुणी डेस्क, वणी: मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी तर्फे आज राजूर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राजूर येथील 100 गरजू कुटुंबांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, हळद, साबण यांचे वितरण करण्यात आले. मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई. स्कुल वणीचे संचालक पी. एस. आंबटकर यांच्यातर्फे ही मदत करण्यात आली.

कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभर लॉकडाऊन लागू केले आहे. या काळात गरीब, मजूर वर्गाची परवड होत आहे. राजूर परिसरात मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. सध्या या परिसरातील उद्योगधंदे बंद झाल्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आली त्यामुळे राजूर येथे जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्णय मॅकरून अकादमीच्या टीमतर्फे घेण्यात आला.

आज बुधवारी सकाळी राजूर येथे मॅकरून अकादमीचा संपूर्ण स्टाफ राजूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याकरीता गेला. तिथे असलेल्या मजूर, शेतमजूर, विधवा, गरजू अशा 100 कुटुंबांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, हळद, साबण यांचे वितरण करण्यात आले. यावेळी अजय कंडेवार, अमोल बावने, आशिष घनकसार, विक्की ताजने इत्यादी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.