तालुक्यातील 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांनी कोविड लस घ्यावी

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांचे आवाहन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासना मार्फत तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात “कोविड लसीकरण” मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील 45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीनी कोविड लस घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे यांनी केले आहे.

कोरोना या संसर्गजन्य रोगापासून सुरक्षीत राहण्यासाठी शासनाने कोविड लसीकरण मोहीम चालू केली आहे. यात मारेगाव तालुक्यात सुद्धा गेल्या अनेक दिवसा पासून प्रत्येक गावा गावात लसीकरण मोहीम चालू आहे.

लस पूर्ण सुरक्षित आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आपण व आपल्या संपर्कातील 45 वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी प्रवृत करावे. जेणेकरून तालुक्यातील कोणताही 45 वर्षावरील व्यक्ती लसीकरनापासून वंचित राहणार नाही. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

मुकुटबन येथील सिमेंट कारखान्याचे भवितव्य अंधारात ?

मारेगाव तालुक्यात आता अवघे 61 ऍक्टिव्ह रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.