मारेगाव तालुक्यात आता अवघे 61 ऍक्टिव्ह रुग्ण

गुरुवारी तालुक्यात आढळले 2 रुग्ण

1

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज शुक्रवारी दिनांक 3 जून रोजी तालुक्यात केवळ 2 पॉझिटिव्ह आढळले आहे. हे दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून दोन्हीही पुरुष आहेत. तर दुसरीकडे तालुक्यातील 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज 242 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट यवतमाळ येथे वरून प्राप्त झाले. यात 1 पॉझिटिव्ह आढळला. तर आज 14 संशयीतांची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात एक पॉझिटिव्ह आढळला आहे. असे एकूण 2 पॉझिटिव्ह आज आढळलेत. अद्याप 130 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 61 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटर वर 16 रुग्ण उपचार घेत आहे तर 40 रुग्ण होम आयसोलेट आहे. डेडीकेटे़ड कोविड हेल्थ सेंटरवर 2 तर 3 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

मुकुटबन येथील सिमेंट कारखान्याचे भवितव्य अंधारात ?

मुलीला आंघोळ करताना न्याहाळणा-या विकृताच्या आवळल्या मुसक्या

1 Comment
  1. […] मारेगाव तालुक्यात आता अवघे 61 ऍक्टिव्ह… […]

Leave A Reply

Your email address will not be published.