धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार व शेती मार्गदर्शन शिबिर

रविवारी सकाळी 10 ते सं. 6 पर्यंत चालणार शिबिर

0
वणी: वणी येथील साधनकर वाडी परिसरात असलेल्या धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार आणि शेती मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. स्मृ. भुलाबाई व स्मृ. शंकरराव सिताराम ढुमणे आणि स्मृ. पार्वताबाई व बळीराम तुकाराम गौरकार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सृदृढ अन् सशक्त समाज घटवायचा असेल तर बालकांना आणि पालकांना सुयोग्य संस्कार अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे माणसाचे मातीशी असलेले अतूट नाते घट्ट करणारा घटक म्हणजे शेती. पण शासकीय धोरणं आणि शेतीकडे पाहण्याकडे समाज्याचा दृष्टिकण हा उदासिन आहे. याविषयी विचारमंथन व्हावे या साठी कौटुंबिक संस्कार आणि शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
या शिबिरात पहिल्या सत्रात सोनुर्ली येथील प्रभाकर गौरकार यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्यांनतर अकरा वाजता किमया मेंदूची आणि जडणघडण व्यक्तिमत्वाची, आधुनिक बालकांचे भविष्य आणि पालकांचे आयुष्य, शेती संस्कृती व व्यवसाय आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे.
या कार्यक्रमात विशेष करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब राजूरकर, अंनिसचे दिलीप सोळंखे, अॅड विनायक काकडे, डॉ करमसिंग राजपूत, शेतकरी नेते अविनाश काकडे हे  मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या शिबिरात 12 वर्षांच्या वरील वयाच्या मुलांना प्रवेश दिला जाणारा आहे.

 

या कार्यक्रमात वृक्ष संवर्धन समितीचे दिलीप कोरपेनवार व नामदेवराव शेलवडे यांचा सत्कार देखील केला जाणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन कृष्णाजी ढुमणे व नामदेवराव गौरकार यांनी केलं आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.