तार कंपाऊंड मध्ये प्रवाहीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी :  जंगली जनावरापासून रक्षणाकरिता लावलेल्या शेतातील तार कंपाऊंड मधील प्रवाहीत विजेच्या झटक्याने शेतमालकाचाच मृत्यू झाला. सदर घटना वणी शहरालगत लालगुडा येथे 28 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. उमेश काशीनाथ झिले (34) रा. लालगुडा असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे. 

पावसाने आता शेतकऱ्यांनी बियाणे पेरण्यास सुरवात केली आहे. उमेशनेही आपल्या लालगुडा येथील शेतात पेरणी केली. रात्रीच्या वेळी पिकांची जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी त्यांनी आपल्या शेतातील तार कंपाऊंड मध्ये विद्युत प्रवाह सुरू करून ठेवला. 28 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उमेश हा शेतात गेला असता अनावधानाने विधुत तारेला त्याचा स्पर्श झाला. यातच विजेचा जोरदार शॉक लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. 

त्याच्या कुटुंबातील लोकांना याबाबत माहिती मिळताच त्याला वणीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मागील एका वर्षापूर्वीच उमेशचा लग्न झाल्याची  माहिती आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.