शेतात काम करणा-या शेतक-याचा सर्पदंशाने मृ्त्यू

मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: झरी-जमणी तालुक्यातील चिंचघाट शिवारात मंगळवारी सकाळी एक सर्पदंशाची घटना घडली. यात शेतात काम करणा-या शेतक-या मृत्यू झाला. प्रल्हाद नामदेव डुकरे (वय 61) असे मृत शेतक-याचे नाव आहे. प्रल्हाद डुकरे हे चिंचघाट येथील रहिवासी होते. मंगळवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे शेतात काम करायला गेले. दरम्यान त्यांना अचानक सर्पदंश झाला. ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या दुर्दैवी घटनेमुळे चिंचघाट गावात शोककळा पसरली आहे. प्रल्हाद डुकरे हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नात असा आप्तपरिवार आहे. शासनाकडे डुकरे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

शेतक-यांनो पावसाळ्यात काळजी घ्या..
शासकीय रुग्णालयात ऍन्टी वेनम (विष प्रतिबंधक) औषधांचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे अनेकांचा सर्पदंशात मृत्यू होतो. पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना सर्वाधिक होतात. त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांनी सर्पदंशासारख्या घटनांना रोखण्यासाठी स्वत:च काळजी घेणे गरजेचे आहे. शेतात काम सुरू करण्यापूर्वी लांब हातांची कपडे आणि बुट परिधान करावे, गम बुट असल्यास अधिक उत्तम. शेतात गवत किंवा झुडपे साफ ठेवावी आणि रात्रीच्या वेळी काम टाळावे, कारण सापांचा सक्रियता त्या वेळी जास्त असते. तसेच, शेतात पहाटे किंवा संध्याकाळी काम करताना टॉर्च आणि स्टिकचा वापर करावा, जेणेकरून सापांचा अंदाज येऊ शकेल. 

Comments are closed.