शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

0

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव बळीराम धांडे (68) यांनी कीटकनाशक प्रशान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धांडे यांनी मंगळवार 30 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी वारगाव ता. वणी येथे कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

विष प्राषण केल्याचे आढळताच त्यांना तातडीने वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवराव धांडे यांच्यावर अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे देवराव धांडे यांनी विषप्रशान केल्याची बातमी कळताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र देवराव धांडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही .

देवराव धांडे हे शेतकरी चळवळीतील एक सुपरिचित नाव असून शेतक-यांच्या हक्कासाठी ते कायम झटणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. ते पंचायत समिती सदस्य पदावर देखील होते. अनेक शेतकरी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. याशिवाय शरद जोशी यांच्या सोबतही त्यांनी शेतकरी चळवळीत काम केले आहे. 

हे देखील वाचा:

पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.