मारेगाव तालुक्यात पुन्हा एका युवा शेतकरी पुत्राची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: अवघे 19 वय असलेल्या शेतकरी पुत्राने विषारी कीटकनाशक सेवन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील घडली. निकेश तुळशीराम आत्राम असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. निकेश हा अविवाहित होता. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तो कुटुंबियांसमवेत जीवन जगत होता. मागील काही दिवसांपासून तो विमनस्क अवस्थेत होता, असे घरच्यांनी सांगितले.

मृतक निकेशच्या वडिलांच्या नावाने 5 एकर शेती आसल्याची माहिती आहे. निकेश शेतीमध्ये आपल्या वडिलांना मदत करायचा. मंगळवारी दिनांक 6 जून 2023 रोजी निकेश शेतात जातो असे सांगून घरून निघून गेला. संध्याकाळी तो वेळेवर परत आला नाही म्हणून म्हणून त्याच्या वडीलांनी व काही नातेवाईकांनी त्याचा गावात व शेतात शोध घेतला. पण तो दिसला नाही.

इतर शेत शिवारात निकेशचा शोध घेत असताना सोयाम यांच्या शेता जवळ त्यांना निकेश खाली पडलेल्या अवस्थेत दिसला. वडिलांनी जवळ जाऊन बघीतले असता त्यांच्या मुलाने विषारी कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली व त्यांनी लगेच सदर माहिती मारेगांव पोलिस स्टेशनला दिली.

माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. निकेशच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे.

आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी घरची बेताची परिस्थिती असल्याने व परिश्रम करूनही शेतात पुरेसे उत्पन्न व्हायचे नाही. यामुळे त्याचे वडील नेहमी चिंतेत असायचे. वडिलांचे हे दुःख व्हायचे. त्यामुळे त्याने हे पाऊल उचचले असावे असे बोलले जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

Comments are closed.