युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन

भास्कर राउत, मारेगाव : ऐन पोळा सणाच्या आदल्यादिवशी एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील हिवरी गावात घडली. प्रवीण शायनिक काळे (33) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक प्रवीण हा हीवरी येथील रहिवासी असून त्याच्या नावाने अर्जुनी येथे 4 एकर शेती आहे. नेहमीप्रमाणे प्रवीण बुधवारी सकाळी 8.30 वाजता शेतात गेला होता. मात्र तिथे त्याने पिकांवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी प्रवीणला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यातील सर्व शेतकरीवर्ग पोळा सणाच्या तयारीत आहे. परंतु पोलच्या एका दिवशाच्या आधीच प्रवीणने आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. ऐन सणासुद्धीच्या तोंडावर शेतकरी आत्म्हत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक प्रवीण याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ पत्नी आणि दोन मुले असा कुटुंब आहे.  

Comments are closed.