अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीचा अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार मुलीचे आईवडील रोजमजुरी काम करतात. तर मुलगी गावातीलच शाळेत इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेत आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे आईवडील सकाळी 7 वाजता मजुरी कामावर गेले. तेव्हा घरात मुलगी व त्याच्या लहान भाऊ हे दोघे होते. सायंकाळी 4 वाजता दरम्यान फिर्यादी महिला घरी आली तेव्हा तिला मुलगी दिसून आली नाही. याबाबत तीन आपल्या मुलाला विचारणा केली असता त्यांनी ताई काही कामानिमित्त दुपारी 2 वाजता वणी येथे गेल्याची माहिती आपल्या आईला दिली.

सायंकाळी पर्यंत वाट बघूनही मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी गावात, वणी शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतले असता मुलगी मिळून आली नाही. मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या आईने 12 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि. अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस कर्मचारी सीमा राठोड करीत आहे.

 

Comments are closed.