जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथे एका इसमाने स्वतःच्या शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केले. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी वणी येथे आणण्यात आले. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. उमेश पंडित बरडे (40) रा. गणेशपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक उमेश हा एका क्रॅशर प्लांटवर नोकरी करायचा. तसेच्या त्याच्या जवळ दीड एकर शेती आहे. गुरुवार 28 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान तो शेतात गेला आणि मिर्चीवर फवारणीची औषध प्राशन केले. कीटकनाशक पोटात गेल्यानंतर काही वेळाने त्याच्या पोटात भयंकर जळजळ निर्माण झाली. त्यामुळे शेतात तो जोरजोरात ओरडू लागला. आवाजामुळे बाजूच्या शेतातील काही शेतकरी धावून आले.
तिथे पोहोचताच त्यांना उमेशच्या तोंडातून फेस निघत असल्याचे आढळले. उमेश बरडे यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती त्यांचे भाऊ मंगेश बरडे यांना दिली. त्यांनी उमेशला तात्काळ वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. ग्रामीण रुग्णालयातील चिकित्सकांनी त्याला मृत घोषित केले. उमेशचे मृतदेह पोस्टमार्टम ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मृतक उमेशच्या मागे पत्नी, 2 मुलं, भाऊ व इतर कुटुंबीय आहे. उमेश बरडे यांनी आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
हे देखील वाचा:
पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून
Comments are closed.