भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी आणि नेहमीच पडणारा दुष्काळ या सर्व संकटांना वैतागून एका विवाहित शेतकरीपुत्राने आत्महत्या केली. पुंडलिक मारोती रुयारकर वय 43 रा. बोरी (गदाजी) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे.
पुंडलिक हा दिनांक बुधवारी दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला रात्री 9 वाजताच्या सुमारास कोणाला न सांगता घरून निघुन गेला होता. रात्री घरच्यांनी गावात शोध घेतला. पण तो कुठेही आढळला नाही. आज गुरुवारी दिनांक 1 सप्टेंबरला घरचे काही व्यक्ती शेतात गेले असता त्यांना पुंडलिक हा शेतामध्ये पडून असलेला दिसला.
त्यांना पुंडलिक यांनी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले. पुंडलिक यांच्या वडिलांच्या नावाने बोरी (गदाजी) येथे 3 एकर शेती आहे. अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी मुळे आणि दोन वेळा झालेल्या पुर बुडाई मुळे चिंतेत असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविला. मृतक शेतकरी पुत्राच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.