कापसाचे दर घटल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

परतीच्या पावसामुळे झालं पिकांचं मोठं नुकसान

0

देव येवले, मुकुटबन: मागील ३ वर्षांपासून सततच्या नापीकीने होरपळलेल्या झरीतालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात कापसाच्या हमीभावा पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून चांगलीच लूट होत आहे. सध्या मिळत असलेल्या 3300 ते 3700 रुपये भावातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यासह झरी तालुक्यात सर्वात जास्त कापसाचे पीक घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे. मात्र परतीच्या झालेल्या पावसाने कापसाचे चांगलेच नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आला आहे. तसेच बाजारात सोयाबीन येताच २३०० रुपये दर मिळत असल्याने बळीराज्यावर नवीनच संकट आले आहे. सरकारने सोयाबीनचे हमी भाव 3 हजार जाहीर केले आहेत. मात्र व्यापाऱ्याकडून दरापेक्षाही भाव कमी देऊन शेतकऱ्याची लूट होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन नाफेडची खरेदी लवकर सूरू करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यानी घेतलेले खासगी कर्ज दिवाळीच्या आधी परतफेड करावयाचे असल्याने कमी दर असूनही बाजारात विक्रीला कापूस, सोयाबीन आणावे लागत आहे. इतरांची दिवाळी प्रकाशात साजरी होणार असल्याने बळीराजाची दिवाळी मात्र अंधारात जाणार आहे

कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला समोर जाणारा शेतकरी यंदा भाव घसरल्याने शेतकऱ्याने कर्ज फेडायचे कसे आणि उदरनिर्वाह कसा चालवायचा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.