शेतकऱ्यांना पीकविमा व 50 हजार सानुग्रह अनुदान द्यावे
मारेगाव तालुका काँग्रेसचे ऊर्जामंत्री यांना निवेदन
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सन 2019 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु जे नियमित कर्जदार होते त्यांना शासनातर्फे 50 हजाराचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार होते. परंतु अजूनपर्यंत नियमित कर्जदारांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसून या पात्र व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित 50 हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेसचे वतीने करण्यात आली.
तसेच मागील वर्षी पडलेला ओला दुष्काळ आणि वारंवार शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या कीड तसेच रोगांनी होणारे नुकसान पाहता शेतकऱ्यांना मागील वर्षीचा सोयाबीन व कपाशी या पिकाचा पीकविमा मिळायला हवा होता. परंतु तो अद्यापही मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कमसुद्धा त्वरित देण्यात यावी अशी मागणी सुद्धा काँग्रेस पक्षाचे वतीने ऊर्जामंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी जि. प.च्या माजी सभापती अरुणा खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, रमण डोये यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा:
खुमासदार राजकीय टोलेबाजीत रंगला पतसंस्थेचा शाखा उद्घाटन सोहळा