कोरोनाच्या भीतीने शहरात अन्य आजारांनी मृत्यूसंख्येत वाढ
हृदयविकाराच्या धक्क्याने व अन्य आजारांनी निधन
पुरुषोत्तम नवघरे: वणी: शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसागणिक 40-41रुग्ण सापडतं आहेत. नागरिकांना आधीपासूनच असणारे बीपी, शुगर, कॅन्सर आदी जुन्या आजाराने उपचार करणाऱ्या लोक धास्तावले आहे. यातच त्यांना हृदयविकाराचे धक्के येत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे मृत्यू होण्याच्या मागील काही दिवसांपासून अनेक घटना शहरात घडत आहे व सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्यस्थितीत तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 400 च्या वर पोहचली आहे. पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बाजारपेठेतील व्यापारी, वकील,डॉक्टर, आदींना कोरोना संसर्ग झाल्याने, हे सर्व दररोज वणीकऱ्यांच्या संपर्कातील असल्याने आता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील वातावरण उष्ण दमट अशा स्वरूपाचे असल्याने, सर्दी, ताप, खोकला, डेंगू आदी संसर्गजन्य आजाराची साथ शहरात पसरली आहे. शिवाय आधीपासूनच कोरोना विषाणू थैमान घालत आहे. कोरोना संसर्गाचे लक्षणे अशीच असल्याने वरील कोणतेही लक्षणे घेऊन दवाखान्यात गेले असता त्याच्यावर योग्य तो उपचार होत नाही.
त्याच रुग्णांना आधीच जुने बीपी,शुगर असे आजार असल्यास आपल्याला कोरोना झाला.अशा भीतीनेच हृदयविकाराच्या धक्क्याने प्राण गमावले आहे. अशा रुग्णांच्या दिवसेंदिवस कमालीची वाढ होताना दिसते आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)