नागेश रायपुरे, मारेगाव: स्वातंत्र दिनाच्या पर्वावर मारेगाव तालुक्यातील चि. बोटोनी येथे ग्रा.पं. कार्यालयात ध्वजारोहण करताना नजरचुकीने राष्ट्रध्वज फाटल्या प्रकरणी मारेगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रा.पं. प्रशासक तथा मारेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रल्हाद मारोती पंडित (45) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भास्कर हुसेन सिडाम (55) रा. बोटोनी यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार. भास्कर सिडाम हे 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजताच्या दरम्याने ग्रामपंचायतच्या आरओ प्लांटवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ग्रा.पं. येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रा.पं. माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आशा वर्कर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सुरू होता.
दरम्यान ग्रा.प.चे प्रशासक असलेले मारेगाव प.स.चे विस्तार अधिकारी प्रल्हाद पंडीत यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना दोरीला झटका मारला असता राष्ट्रध्वज फाटला. दरम्यान ग्रा.पं.चा कर्मचारी शरद डाहुले यांनी झेंडयाच्या खांबावर चढून झेंड्याची गाठ सोडून राष्ट्रध्वज खाली उतरवला व त्यानंतर राष्ट्रध्वज बदलविण्यात आला व ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असन प्रशासक प्रल्हाद पंडित यांच्यावर 195/20 कलम 2,3 (A) राष्ट्रीय सन्मानाचा अप्रतिष्ठित प्रतिबंध अधिनियम 1971 सह कलम 5 व भारतीय ध्वज संहिता भाग 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि. अमोल चौधरी करीत आहे