वणीत वाईन शॉप चालकांकडून ग्राहकांची आर्थिक लूट
बम्परवर एमआरपीपेक्षा 200 ते 500 रुपये अधिक दराने विक्री
विवेक तोटेवार, वणी: रविवार 9 मे पासून कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर वाईन शॉप व बार यांना देखील दुकानातून थेट विक्री न करता घरपोच सेवा द्यावी असा आदेश आहे. परंतु शासनाच्या आदेशाची पायमल्ली दारू विक्रेत्यांकडून खुलेआम होत आहे. याशिवाय एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री करून ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे दारूबंदी विभाग काय करीत आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे.
काहीं ग्राहकांच्या म्हणण्यानुसार मोठया 750 एमएलच्या बॉटलमागे (बम्पर) 200 ते 500 रुपये अधिक आकारले जात आहे. तर 180 एमएल वर ब्रँड बघून 100 ते 150 रुपये अधिक आकारले जात आहे. हा सर्व प्रकार दारू बंदी विभागापासून लपलेला आहे असे नाही. यानंतर संबंधित विभाग या वाईन शॉप धारकाविरद्ध कोणते पाऊल उचलणार याकडे वणीकरांची लक्ष लागले आहे.
सध्या अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत आहे. तर वाईन शॉप व बार मधून फक्त घरपोच दारू विक्री करण्याचा आदेश आहे. परंतु वणीत दोन्ही वाईन शॉप मधून थेट दुकानातूनच दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे. वाईन शॉप पुढे चार ते पाच युवक पावत्या बनवून वाटेल त्या किंमतीत दारू विक्री करीत आहे. काही ग्राहक तर थेट दुकानात जाऊन दारू खरेदी करीत आहे.
हे देखील वाचा:
कोरोना रुग्णासंख्येच्या स्फोटनंतर आज मारेगाव तालुक्याला दिलासा