वणीकरांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच

क्रिकेट टिम तर्फे धान्याच्या कीटचे वाटप, पवन एकरे व सहका-यांतर्फे ब्लँकेट वाटप व भोजनदान

विवेक तोटेवार, वणी: सध्या पूर परिस्थिती ओसरली असून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. पवन एकरे व मित्रमंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी ब्लँकेट, भोजन व औषधी वाटप तर लगान क्रिकेट क्लब तर्फे अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सध्या पूरग्रस्तांना मदतीची गरज लक्षात घेऊन विविध छोटे मोठ्या संघटना तसेच गृप मदतीसाठी सरसावले आहेत. 

वणी शहरातील लगान क्रिकेट क्लब व मित्र परिवारानी तालुक्यातील कोना गावाला 21 जुलै रोजी भेट दिली. त्यांना मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच या क्लबच्या खेळाडूंनी याना मदत करण्याचे ठरविले. पैसे गोळा करून अन्नधान्याच्या 40 किट बनविण्यात आल्या. कोना गावातील गरजवंतांना अन्नधान्याची किट देऊन त्याना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या किटमध्ये प्रामुख्याने दाळ, तांदूळ, तेल, साखर तिखट, हळद, मीठ, बिस्कीट इत्यादी दैनंदिन आहारातील वस्तू आहे.

पवन एकरे व मित्रमंडळीतर्फे ब्लँकेटचे वाटप
पूर परिस्थिती लक्षात घेऊन पवन एकरे व मित्र मंडळीतर्फे पूरग्रस्तांना 500 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली. पूरग्रस्तांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. या तीन दिवसांच्या काळात पवन एकरे हे त्यांच्या टीमसह हजर होते. तिथे त्यांनी पूरग्रस्तांची गरज ओळखून त्यांना विविध प्रकारची मदत केली. या कामात त्यांना सावर्ला गावातील रहिवाशांना मोठी मदत केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.