चिखलगाव येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

35 ग्राम सोन्याची पोत व 16 हजार रोख लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : पती-पत्नी गाढ झोपेत असताना घराचा मागील दार खोलून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. शहरालगत चिखलगाव येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली.

चिखलगाव येथील रहिवासी जयप्रकाश पत्रुजी राजूरकर (59) आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहे. येथील शेतकरी नगरमध्ये आपल्या पत्नीसह राहतात. गुरुवार 21 जुलै रोजी सायंकाळी पती पत्नी दोघ जेवण करून 10.30 वाजता झोपून गेले. रात्री 12.30 वाजता सुमारास त्यांची पत्नी बाथरूम जाण्यासाठी उठली असता घरातील मागील दरवाजा उघडा दिसला.

शंका आल्यामुळे दोघांनी दुसऱ्या बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता प्लायवूडचा कपाटामध्ये ठेवलेला बॅग दिसून आला नाही. घरात इकडे तिकडे शोध घेतले असता जिन्याजवळ रिकामा बॅग सापडला. तर बॅगमध्ये ठेवलेली 34.560 ग्रॅमची सोन्याची काळीपोत किंमत 56 हजार व नगदी 16 हजार असे एकूण 72 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.

चोरीबाबत फिर्यादी जयप्रकाश राजूरकर यांनी शुक्रवारी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि माया चाटसे करीत आहे.

Comments are closed.