गुटखा तस्करांवर कार्यवाही करण्यास प्रशासनाची दिरंगाई
गुटखा तस्करांचे कारंजा, वरोरा, वणी ते मुकुटबन कनेक्शन
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. गुटखा तस्करीची कारंजा, वरोरा, वणी ते मुकुटबन अशी लिंक असून गुटखा तस्करांवर कार्यवाही करण्यास अन्न औषध प्रशांसनाची दिरंगाई होत आहे.
झरी तालुक्यात सुंगधित तंबाखूसह गुटखा तस्करी प्रचंड वाढली आहे. तरुणांसह वयोवृद्धाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या गंभीर बाबीकडे पोलीस व संबंधित विभाग अर्थकारणातून गप्प असल्याची चर्चा आहे. यापूर्वी कारंजा येथील ‘फिरोज’ नामक गुटखाकिंगने संपूर्ण जिल्ह्यासह झरी तालुक्यात आपले जाळे पसरविले आहे. त्याच्या माध्यमातून वरोरा येथून तालुक्यातील मांगली येथे मारोती व्हॅनद्वारे गुटख्याचा पुरवठा होत आहे.
तालुक्यात ६ दुकानदार सदर सुगंधित बोगस गुटखा आणून प्रत्येक पानटपरी चालक त्यांच्या टपरीवर पोच देत आहे. गुटखा विक्री करणारे दुकानदारांचे पोलिसा सोबत आर्थिक व्यवहार चांगले असल्याने कोणतेही कार्यवाही होत नाही असा आरोप होतोय. गुटखा तस्करीचे मुख्य ठिकाण मांगली असून या गावात तीन दुकानदार गुटखा विक्री करीत असून एक मुख्य तस्कर तालुक्यातील अनेक ठिकाणावर गुटखा सप्लाय करतो. या सप्लायरला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून मारोती व्हॅन मध्ये भरून गुटखा मांगली गावात डुप्लिकेट (बोगस) गुटखा पुरविल्या जात आहे. तिथूनच संपूर्ण तालुक्यात सप्लाय केला जातो.
या तस्करीला कारंजा येथील फिरोज ,वरोरा येथील व याना जोडीदार चावला असा असून हे कनेक्शन मुकुटबन व मांगली पर्यंत येऊन ठेपले आहे. डुप्लिकेट गुटखा खाल्याने तालुक्यातील तरुण युवकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असुन वेगवेगल्या गंभीर आजाराला समोर जावे लागत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे युवकांचा जीव धोक्यात आला आहे. गुटखा तस्करांचे नाव, गाव, व गाडी माहीत असताना कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत असून त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.