वणीत ऑनलाईन फुड मिळण्यास आणखी अवकाश

येत्या चार दिवसांत सुरु होण्याची शक्यता...

0

निकेश जिलठे, वणी: सरकारने तीन दिवसांआधी ऑनलाईन फूड डिलिव्हरीला परवानगी दिली. मात्र अद्यापही बाहेर गोंधळाचे वातावरण व काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे रेस्टॉरन्ट, खानावळ, किचन चालकांनी किचन सुरू केलेले नाही. परिणामी वणीकरांना आणखी तीन चार दिवस ऑनलाईन फूड सेवेसाठी वाट बघावी लागण्याची शक्यता आहे.

वणीमध्ये अलिकडेच ऑनलाईन फूड डिलिव्हरी सुरू झालेली आहे. अल्पावधीतच ही सेवा चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या वणीत स्विगी आणि झोमॅटो या दोन फूड डिलिव्हरी कंपनी सेवा देतात. या कंपनीशी जुळलेले रेस्टॉरन्ट आणि किचनमध्ये तयार केलेल्या फूड ही कंपनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. लोकांचे जेवणाबाबत गैरसोय लक्षात घेऊन सरकारने तीन दिवसांआधी ऑनलाईन फूड डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. त्याच जे रेस्टॉरन्ट घरपोच डिलिव्हर देऊ शकते त्यांना ही फूड डिलिव्हरीची परवानगी आहे. मात्र काही अडचणीमुळे वणीत अद्यापही ही सेवा सुरू झालेली नाही.

याबाबत ‘वणी बहुगुणी’शी बोलताना मोंटू का ढाबाचे संचालक मोंटू वाधवाणी म्हणाले की….

गेल्या आठ-दहा दिवसांपासून धाबे बंद असल्याने रेस्टॉरन्ट चालकांची परिस्थिती सध्या वाईट आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्याने आम्हाला धाबे उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र ग्राहक किती खरेदी करतो यावर हे सर्व अवलंबून आहे. आज जर किमान डाळ आणि भात जरी विक्री करण्याचा विचार केला तरी माल विकला गेला नाही तर त्याचा बोझा आमच्यावर पडू शकतो. सध्याच्या परिस्थितीत असा धोका पत्करणे आमच्यासाठी कठिण आहे.

डीअर बिर्याणीचे संचालक सचिन मराठे प्रतिक्रिया देताना म्हणाले की…
ऑनलाईन फूड डिलिव्हरीत वणीकरांचा नॉनव्हेजवर भर अधिक असतो. काल लोकांनी मांस विक्रीसाठी गर्दी केली त्यामुळे लोकांचा मांसाहारावरचा कल कमी झालेला नाही हे दिसून येते. आता मांस विक्रीलाही परवानगी मिळाल्याने बिर्याणी ऑनलाईन विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसात किचनमध्ये पदार्थ बनवण्यास सुरुवात करण्यात येईल.

धाब्यात, खानावळीत बसून खाण्यास परवानगी नाही
सरकारने खबरदारी घेत केवळ ऑनलाईन फूड डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. त्यामुळे रेस्टॉरन्ट चालकांना केवळ रेस्टॉरन्टचे किचन सुरू करता येणार आहे. त्यातही तिथून केवळ ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणा-या कंपनीलाच किंवा घरपोच सेवा देणा-या रेस्टॉरन्ट आणि किचनलाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना हॉटेल, खानावळीत जाऊन जेवण करता येणार नाही.

काय म्हणतात फूड डिलिव्हरी कंपनी
आम्ही फूड डिलिव्हरी कंपनीला याबाबत संपर्क साधला असता त्यांनी रेस्टॉरन्ट जेव्हा किचन सुरू करणार तेव्हा पासून आम्ही सेवा देण्यासाठी सुरुवात करणार आहोत. दरवेळी आम्ही ग्राहकांच्या हातात पार्सल देत होतो. मात्र आता नवीन आदेशानुसार आम्हाला पार्सल ग्राहकांच्या गेटवरच ठेवता येणार आहे. आमची टीम सज्ज असून रेस्टॉरन्ट सुरू होताच वणीकरांना ऑनलाईन फूड डिलिव्हरीची सेवा मिळणार.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.