पोलिसांतर्फे ट्रकचालकांसाठी भोजनाची व्यवस्था

मुकुटबनमध्ये अडकले मध्यप्रदेशातील ट्रकचालक

0

सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथील एका कंपनीत लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेश येथील ट्रक अडकले आहेत. सध्या हॉटेल ,धाबे,खानावळ बंद झाल्याने ट्रक चालकांना जेवणाची सोय उपलब्ध होत नव्हती. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी ट्रकचालकास जेवणाची व्यवस्था केली.

मुकुटबन परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. लॉकडाऊन नंतर सर्व वाहतून ठप्प झाली आहे. त्यामुळे मुकुटबन येथे आलेल्या ट्रक चालकांना थांबण्याशिवाय पर्यात नव्हता. त्याच धाबे, खानावर बंद असल्याने त्यांचे हाल होत होते. ही बाब काही पोलीस कर्माचा-यांनी ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या कानावर टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ठाण्यातील काही पोलिसांनी व होमगार्डनी स्वतः या ट्रकचालकांच्या जेवणाची व्यवस्था केली. सुमारे 20 ते 25 ट्रकचालकांना जेवण देण्यात आले. यावेळी एएसआय सुरपाम, प्रवीण ताडकोकुलवार, रंजना सोयाम, प्रदीप कवरासे, रमेश मस्के, स्वप्निल बेलखेडे, होमगार्ड प्रजोत ताडूरवार व इतर होमगार्ड उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.