मारेगावात सागवानचा अवैद्य साठा जप्त

कार्यवाहीने दणाणले अवैध सागवान बाळगणाऱ्यांचे धाबे

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्राम हिवरी येथे 50 हजार रुपयांचे अवैध सागवान व सुतार काम करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. रविवारी सकाळी मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे मारेगाव वनविभागाला अवैध सागवानासंबंधी गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे वनपरिक्षेत्र अधिकारी जे.व्ही. घुगे हे आपल्या पथकासह सकाळी ८ वाजताच्या सुमारात भोवरी येथे गेले. तिथे धाबेकार नामक सुतार काम करणाऱ्या इसमाच्या घरी धाड टाकून त्यांनी 50 हजार रूपयांचे अवैध सागवान जप्त केले.

या कारवाई दरम्यान सुतार काम करणारा इसम घरी हजर नव्हता. त्यामुळे जप्त केलेले संपूर्ण साहित्य, वनविभागाचे कर्मचारी यांनी वनविभागाच्या वाहनात टाकून मारेगाव येथे आणले व वनपरिक्षेत्र कार्यालयात त्याचा पंचनामा केला. वनविभागाच्या कायद्यानुसार अवैध सागवान बाळगणाऱ्या धाबेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. या जप्तीच्या कारवाईने अवैध सागवान बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.