गौण खनिज दलाल संघटनेची कार्यकारिणी गठीत

अध्यक्षपदी ललित चचडा तर उपाध्यक्षपदी मदन पेंदाने व शंकर उंबरकर

0

विवेक तोटेवार, वणी: उपविभागातील वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील गौण खनिज दलालांनी एकत्र येऊन संघटनेची स्थापना केली. येथील घुग्गुस रोडवरील बैठक रेस्टॉरंटमध्ये रविवार 12 जून रोजी मीटिंग घेऊन संघटनेची कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. या वेळी ललित उर्फ टीटू चचडा यांची सर्वानुमते गौण खनिज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष पदावर मदन पेंदाने व शंकर उंबरकर, सचिव अनिल पिंपलशेंडे, कोषाध्यक्ष संतोष कोणप्रतीवार यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे मुख्य संयोजक व सल्लागारपदी जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून वणी शहराचे वेगाने विस्तार होत आहे. शहराच्या आजूबाजूला अनेक लेआऊट पडले आहे. खासगी घरांसह बहुमजली सदनिकांचे निर्माणकार्य जोमात सुरू आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणी वाढली आहे. तालुक्यातील भुरकी, रांगणा, आपटी रेती घाटासह वरोरा व घुग्गुस येथील रेती व्यावसायिक दलालामार्फत वणी शहर व तालुक्यात रेती विक्री करतात.

रेती खरेदी विक्रीच्या व्यवसायात अनेक प्रकारची अडचणी येतात. तसेच ग्राहकांना नाईलाजाने महागड्या भावात रेती खरेदी करावी लागत आहे. शहरातील अनेक तरुण न्यूनतम कमिशन ठेवून रेती, गिट्टी, मुरुम, डस्ट या गौण खनिज ग्राहकांना पुरवठा करण्याचे कार्य करतात.

गौण खनिज संघटन कार्यकारिणी गठन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र कोठारी यांनी मांडले. अध्यक्ष ललित चचडा यांनी उपस्थित सभासदांना संबोधित केले. तर आभार उपाध्यक्ष मदन पेंदाने यांनी मानले.

या वेळी गणेश मोहबिया, विलास बांदूरकर, दिलीप गुंजेकर, देवेंद्र खामणकर, आकाश यादव, प्रणय ईखारे, गोलू गारघाटे, उत्तम मडावी, विक्रम यादव, विभाकर निवळकर, अकीब पटेल, रुपेश पेंदाने, सुरज बोढे, गौरव बदकी, सोमु आत्राम, पप्पू पांपट्टीवार, जमीर शेख सय्यद, राज कापसे, किशोर रिंगोळे, प्रदीप उंबरकर, प्रवीण आसुटकर, सतीश पिदूरकर, नवीन बामणे, शाहरुख शेख उपस्थित होते.

हे देखील वाचा:

गोकुळ नगर येथील विनर्स बार चोरट्यांनी फोडले

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

Leave A Reply

Your email address will not be published.