माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

24 जानेवारीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या 24 जानेवारीला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी 11 वाजता सत्कार सभारंभ होणार आहे. सोबतच वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष टीकाराम कोंगरे व बँक संचालक राजू येल्टीवार यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

Podar School 2025

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बाळू धानोरकर यांसह सत्कारमूर्ती राहणार आहे. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका युवक काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे आयोजन तालुका काँग्रेस कमेटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, युवक काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमेटी व विद्यार्थी काँग्रेस कमेटी यांनी केली आहे.

हेदेखील वाचा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

हेदेखील वाचा

झरी तालुका काँगेस कमेटीच्या अध्यक्षपदी आशीष खुलसंगे

Leave A Reply

Your email address will not be published.