माजी सैनिक बापूराव केळकर यांचे निधन

गुरुवारी सकाळी साडे 11 वाजता अंत्यसंस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: माजी सैनिक श्री. बापूराव उद्धवराव केळकर (वय 81) यांचे आज, दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता नागपूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केळकर यांनी विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर यांचे सुमारे 25 ते 30 वर्षे ड्रायव्हर म्हणून प्रामाणिक सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, दोन मुले मनोज व महेंद्र तसेच नातवंडे कुमारी संस्कृती, मिराज, यथार्थ आणि मोठा केळकर परिवार असा आप्तपरिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे. अंत्ययात्रा त्यांचे राहते घर भीम नगर, गौरक्षण जवळ वणी येथून निघणार आहे. वणी बहुगुणी तर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली.

Comments are closed.