चौपदरी रस्त्याचे काम कामचलावू चालक, सुपरवायजरच्या भरोसे

0

रफिक कनोजे, मुकूटबन: मुकुटबन येथे गेल्या एक महिन्यापासून चौपदरी रस्त्याचे काम चालु आहे. परंतु पोकलेन (मोठी बुलडोजर) वर अनुभवी चालक नसल्यामुळे आणि देखरेखीसाठी अनुभवी अभियंता नसल्यामुळे मुकूटबन येथील चौपदरी रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मुकुटबन ग्रामवासी त्रस्त झाले आहे.

दोन वर्षांपुर्वी रुइकोट ते हिवरदरा 9 किलोमीटर लांब, सात मीटर रुंद आणि मुकूटबनात चौपदरीकरण असा वीस कोटी रुपयांच्या राज्यमार्ग कामाचे भूमीपूजन गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हस्ते झाले. दोन वर्षांपासुन ह्या मार्गाचे काम सुरु आहे. ह्या कार्याची मुद्दत दोन महिन्यानंतर संपणार आहे पन अजुनही ह्या रस्त्याचे नउ किमी सिंगल कोट डामरीकरण सुद्धा पूर्ण झाले नाही.

रुइकोट ते मुकुटबन येथील ७०० मीटर सोडुन खडकी पर्यंत फक्त चार किमी सिंगल कोट डामरीकरण जुन महिन्यात केले. अजूनही ह्या चार किलोमीटर मार्गावर दोन डामरीकरणाचे थर बाकी आहे. खडकी ते हिवरदरा पाच किमी मार्गाचे सिंगल कोट डामरिकरण सुद्धा केले नाही. त्यामुळे खडकी ते हिवरदरा मार्गावरील शेतकर्यांची पिके धुळीने खराब होत आहे. धुळीमुळे शेतकऱ्यांची पिक उत्पादन क्षमता कमी झाली आहे.

दिवाळीपुर्वी मुकूटबन येथील राजराजेश्वर मंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर ७०० मीटर मार्गाचे काम सुरु झाले. तेव्हा सरपंच शंकर लाकडे ह्यांना माहित झाले कि हा मार्ग दुपदरी होत आहे तेव्हा सरपंच शंकर लाकडे यानी हे काम बंद करुन चौपदरी साठी पाठपुरावा केला. त्यांचा प्रयत्नांना यश सुध्दा मिळाले. सरपंच शंकर लाकडे व आमदाराचे हस्ते दुसऱ्यांदा ह्या मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले.

मुकूटबन येथील चौपदरीकरणाच्या कामाला कृषी उत्पन्न बाजार समिती कडुन येताना डाव्या बाजुने सुरुवात झाली. परंतु पोकलेन (मोठी बुलडोजर) वर अनुभवि चालक नाही आणि मार्ग देखरेखीसाठी अनुभवी अभियंता सुध्दा नाही. पोकलेन मशिन सुध्दा आठवड्यातून तीन दिवस बंद पडते.

मुख्य रस्त्याच्या बाजुला खोदकाम करताना अनेक जागी नळाची पाइपलाईन लिकेज व बीएसएनएलचे केबल जागोजागी तुटल्यामुळे नेटलिंकिंग सेवा बंद झाली आहे. परिणामी सेतुचे आणि बॅंकेचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहे. त्यामुळे नागरीकांचे, विध्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प पडत आहे. नांदेड येथील ठेकेदाराचे तर ह्या कामावर संपूर्ण दुर्लक्ष आहे. ह्या कामाचा अवधी दोन महीने शिल्लक आहे. दोन महिन्याच्या मुद्दतीत नउ किलोमीटर चा मार्ग पूर्ण होइल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.