मित्राला सिमकार्ड देणे आले अंगलट, जावे लागले आयसोलेशनमध्ये

तरुणावर आली 'खाया पिया कुछ नही, गिलास फोडा बाराना' म्हणायची वेळ

0 1,830

जब्बार चीनी, वणी: वणीतील निजामुद्दीन परिसरात गेलेल्या 3 लोकांना यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये नेण्यात आले आहे. त्यासोबतच आणखी एक म्हणजे चौथा व्यक्तीही यवतमाळच्या आयसोलेशनमध्ये आहे. मात्र तो निजामुद्दीनला गेला नव्हता. मात्र त्याचे सिमकार्ड त्याच्या मित्राने नेले होते. निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या तिघांना मोबाईल लोकेशन ट्रेस करून आयसोलेशनमध्ये टाकण्यात आले. त्या लोकांसोबतच चौथ्याचे सिमकार्ड असल्याने सध्या तो ही आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे ‘खाया पिया कुछ नही, गिलास फोडा बाराना’ म्हणायची वेळ त्याच्यावर आलीये.

ती चौथी व्यक्ती इस्लामपु-यातील रहिवाशी असून ती व्यक्ती 21 वर्षांची आहे. त्या व्यक्तीच्या नावावर त्याच्या मित्राने सिम कार्ड घेतले आहे. निजामुद्दीन परिसरातून जे लोक बाहेर राज्यात गेले त्यांचे मोबाईलवरून लोकेशन शोधण्यात आले. निजामुद्दीन दर्गाहमध्ये गेलेल्या तीन व्यक्तीना आयसोलेशन वार्डात टाकण्यात आले आहे. मात्र त्यांच्या सोबत या चौथ्या व्यक्तीचेही सिमकार्ड आढळले.

मरकज प्रकरण उघडकीस येताच दिल्लीतील निजामुद्दीन भागात असणा-या व्यक्तींचा दिल्ली पोलिसांनी शोध घेतला. दिल्ली येथील गोपनीय शाखेतून सदर लोकांचे नाव मोबाईल नंबरवरून घेण्यात आले. त्यात या चौथ्या व्यक्तीचेही नाव होते. मुळात हा तिथे गेलाच नव्हता. तो एक ते दीड वर्षापासून वणी बाहेर गेलेला नाही. तो सध्या दुकानात काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रातिनिधिक फोटो

दिल्ली पोलिसांच्या गोपनिय शाखेतून नाव आल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने मी नाही तर माझा मित्र गेला होता. माझे सिम कार्ड तो वापरतो असे त्याने सांगितले. तेव्हा त्याच्या मित्रालाही ताब्यात घेउन संशयित म्हणून तपासणीसाठी यवतमाळला पाठवण्यात आले आहे.

 ‘खाया पिया कुछ नही, गिलास फोडा बाराना’
केवळ दोन दिवसांची गोष्ट आहे असे सांगून त्या तरुणाला यवतमाळला आयसोलेशन वार्डमध्ये नेण्यात आले. दरम्यान नागपूर येथील तपासणी मशिन खराब झाल्याने अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेले नाही. त्यामुळे तो अद्यापही आयसोलेशन वार्डमध्ये आहे. परिणामी त्याला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता मात्र सिमकार्ड मित्राला देणे त्याच्या अंगलट आले व त्यालाही आयसोलेशन वार्डात जावे लागले यामुळे ‘खाया पिया कुच नही, गिलास फोडो बाराना’ अशी म्हणायची वेळ त्याच्यावर आली.

Comments
Loading...