मोफत रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिर 20 मे रोजी
रुधाजी पाटील देरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेदा क्लिनिकचे आयोजन
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दिवंगत रुधाजी पाटील देरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 20 मे रविवारला सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत रोगनिदान, रक्तदान व उपचार शिबिर वरोरा रोडवरील नंदेश्वर देवस्थान येथे आयोजित केले आहे. या शिबिरात डॉ. गणेश लिमजे, डॉ. सुनील जुमनाके, डॉ. महेंद्र लोढा, डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. पवन राणे, डॉ. सचिन दुमोरे, डॉ. शिरीष कुमरवार, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. राहुल खाडे, डॉ. प्रेमानंद आवारी, डॉ. विजय खापणे, डॉ. सचिन मुसळे, डॉ. प्रीती खाडे, डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. अमोल पदलमवार, डॉ. मुग्धा मुसळे, डॉ. पल्लवी पदलमवार, डॉ. मनीष ढोकणे ही शहरातील तज्ज्ञ डॉक्टर्स मंडळी रोगनिदान, उपचार व मार्गदर्शन करतील.
हृदयरोग, मधुमेह, बालरोग, स्त्रिरोग, नेत्ररोग, दंतरोग, अस्थिरोग, शल्यरोग, पोटाचे विकार, मूत्रविकार, मूळव्याध, अॅपेंडिक्स, हायड्रोसील, हर्निया आणि इतर रोगांवर निदान व उपचार इथे होतील. या शिबिराच्या आयोजनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र आवारी, वणी ग्रामीण रुग्णालयाचे समस्त अधिकारी आणि कर्मचारी, वणी डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन, जीवनज्योती ब्लड बँक नागपूर, नंदेश्वर देवस्थान विशेष सहकार्य करीत आहेत. रुग्णांनी जुने व सुरू असलेले वैद्यकीय रिपोर्टस व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत असेदेखील सांगण्यात आले आहे. तसेच दर महिन्याच्या 16 तारखेला वरोरा रोडवरील नंदेश्वर देवस्थान येथे होणाÚया मोफत रोगनिदान शिबिरासाठी वणी स्थित खाती चौकातील गणराज मेडिकल येथे संपर्क साधण्याची विनंती केली आहे. या शिबिराचा लाभ घेण्याची विनंती वेदा क्लिनिकचे डॉ. विवेक रमेशराव गोफणे आणि डॉ. वैशाली विवेक गोफणे यांनी केली आहे.