गुरुवारी मारेगाव येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर 

डॉ. महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीचे उपक्रम... मोफत आरोग्य तपासणी व औषधीसह नैत्र शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, रक्त तपासणी, इसीजी, एक्सरेची सुविधा 

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीतर्फे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. मारेगाव नगर पंचायत पटांगणात आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता होणार आहे. न्यू ईरा सुपर स्पेशीलिटी हॉस्पिटल नागपूर, सि.एच.एल. सुपर स्पेशीलिटी हॉस्पिटल नागपूर व लोढा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वणी यांच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात येत आहे.

या शिबिरात डॉ. रोहन आईचवार, डॉ. संदीप धूत (हृदयरोग तज्ञ), डॉ. कपिल गेडाम (मेंदुरोग तज्ञ), डॉ. शशांक वंजारी (पोटविकार तज्ञ), डॉ. पंकज जावंदिया (मूत्ररोग तज्ञ), डॉ. संचिता नगराळे, डॉ. नीलेशा बलकी, डॉ. मनीषा जुमनाके, डॉ. प्रीती लोढा (प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ), डॉ. गणेश लिमजे, डॉ. सूरज चौधरी, डॉ. शिरीष कुमरवार (मेडिसीन विभाग), डॉ. सुनील जुमनाके, डॉ. संदीप मानवटकर, डॉ. पवन राणे (बालरोग तज्ञ), डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. अक्षय खंडाळकर (सर्जरी विभाग), डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. प्रतीक कावडे, डॉ. विजय खापणे (अस्थिरोग विभाग), डॉ. स्वप्नील गोहोकर (नेत्ररोग विभाग), डॉ. अमोल पदलमवार (दंतरोग तज्ञ), डॉ. रौनक कोठारी (फिजिओथेरपी विभाग), डॉ. प्रदीप ठाकरे, डॉ. नईम शेख, डॉ. विवेक गोफणे, डॉ. दिलीप सावनेरे (जनरल फिजीशियन) सेवा देणार आहे.

महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी व औषधीसह ईसीजी, एक्सरे, 2 डी इको, नैत्र शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, रक्त तपासणी सुविधा मोफत केली जाईल. गरजू रुग्णाना मोफत औषधीचे वाटप या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरात येताना पूर्वी चालू असलेली औषधीची चिठ्ठी सोबत आणावी लागणार आहे. मारेगाव येथे गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आयोजित या भव्य महाआरोग्य शिबिराचे परिसरातील रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावे. असे आवाहन मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीतर्फे करण्यात आले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भव्य मोफत महाआरोग्य शिबिरात नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

मारोती गौरकार : 9881557165                  अंकुश माफुर : 9527530631                      नंदेश्वर आसूटकर :9673585965                प्रवीण विखनकर: 9527039521                अरविंद वखनोर: 9067569029                    समीर सैय्यद: 9765658466                        विजय बोथले: 9673141148

Comments are closed.