युवा व्यावसायिक पियूष मेहता यांची आत्महत्या

प्रगती नगर येथील राहत्या घरी घेतला गळफास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील युवा व्यावसायीक पियूष पारसमल मेहता (35) यांनी आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. पियूष हे प्रगती नगर येथील रहिवासी होते. त्यांचा शाळा क्रमांक 3 जवळ धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. दुपारच्या सुमारास त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येतात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पियूष यांनी घेतलेल्या या पावलामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पियूष यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कळू शकले नाही.

Comments are closed.