रॉकेट्री: द नांबी इफेक्ट… सुजाता थिएटरमध्ये रिलिज, सत्य घटनेवर आधारीत

देशद्रोहाचे आरोप झाल्यानंतर लढणा-या सच्चा वैज्ञानिकाची कहाणी.... IMDB वर 8.8 स्टार, बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: अभिनेता आर माधवनची बहुप्रतिक्षीत मुव्ही ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज झाला आहे. ही मुव्ही एका सत्य घटनेवर आधारीत असून विक्रम साराभाई व एपीजे अब्दल कलाम यांच्यासोबत काम केलेले सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयु्ष्यावर बेतलेली आहे. नंबी यांची भूमिका आर माधवन यांनी केली आहे. नंबी हे इस्रोचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्यावर पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा खोटा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांनी दिलेला लढा आणि त्यातून सहिसलामत सुटण्याचा लढा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. सध्या हा सिनेमा चांगलाच चर्चेत असून IMDB वर या सिनेमाला 10 पैकी 8.8 स्टार मिळाले आहे.

या सिनेमात आर माधवन सह सिमरन, रजित कपूर, मीशा घोषाल यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच शाहरुख खान देखील या सिनेमात आपल्याला पाहुण्या मात्र महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आर माधवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये हा चित्रपट बघता येणार आहे. तसेच चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.