आगळी वेगळी प्रेमकहाणी – चंडीगढ करे आशिकी

आयु्ष्यमान खुराणा प्रेक्षकांच्या भेटीला, वणीत सुजाता टॉकीजमध्ये सिनेमा रिलीज

बहुगुणी डेस्क: रॉक ऑन आणि कायपोचे सारखी हिट मुव्ही डिरेक्ट केल्यानंतर आता दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा चंडीगढ करे आशिकी हा मुव्ही रिलीज झाला आहे. वणीतील सुजाता टॉकीजमध्येही हा मुव्ही आपल्याला पाहता येणार आहे. चंडीगढ करे आशिकी ही एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी जी पहिल्यांदाच पडद्यावर येत आहे.

मनविंदर मुंजाल उर्फ मनू आणि मानवी बरार यांची प्रेमकहाणी यात दाखवण्यात आली आहे. मात्र कहाणीत ट्विस्ट येतो जेव्हा हिरोईन बाबत अचानक काही गोष्टी हिरोच्या लक्षात येतात. सिनेमाच्या प्लाटचे आणि नाविण्यपूर्ण लव्ह स्टोरीचे समिक्षकांनी चांगलेच कौतुक केले आहे. आयुष्मान खुराणा, वाणी कपूर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका असून सचिन जिगर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते (येथे क्लिक करा). व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएम बुकिंगची लिंक – https://paytm.com/movies/wani/tadap-movie-ticket-booking-04q8mdliq

Comments are closed.