गाडगेबाबांच्या विचारानी संपूर्ण राष्ट्र प्रगत होईल- काळे महाराज

विविध उपक्रमांनी संत गाडगेबाबा जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: संत गाडगे बाबांच्या जन्मामुळे अनेक कुळांचा उद्धार झाला. त्यांच्या कीर्तनातून समाजात जाणीव जागृती झाली. अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळाली. असं प्रतिपादन कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराजांनी केलं. धोबी समाज सामाजिक सांस्कृतिक संस्था, ड्रायक्लिन प्रेस असोसिएशन महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने निळापूर रोडवरील ब्राह्मणी फाटा येथील श्री संत गाडगेबाबा स्मारक येथे संत गाडगेबाबांची 148 वी जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी कीर्तनकार काळे महाराजांनी संत गाडगेबाबांचा जीवनपट उभा केला. ते पुढे म्हणाले की, गाडगेबाबा हे राम तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कृष्ण आहेत. रामाने 14 वर्षे वनवास भोगला. तर गाडगेबाबा हे आयुष्यभर घराबाहेरच होते. त्यांच्याकडे कोणतीच लौकिक संपत्ती नव्हती. तरीदेखील ते आज विश्वात वंदनीय आहेत.

गाडगेबाबांना समजून घेणं खूप कठीण आहे. ते जर समजले तर सगळ्या अंधश्रद्धा दूर होतील. मेलेल्याला खांदा देण्यापेक्षा पडलेल्या माणसाला हात द्यावा. दिवसभर हसत खेळत राहणारा माणूस खरा श्रीमंत. माणसानं अनेक देवतांची मंदिरे बांधलीत. मात्र मानवी देहाचं हे मंदिर फक्त देवाने बांधलं. आपण ज्या गावात जन्मलो तेच खरं तीर्थ आहे. आपला आत्मा हाच परमात्मा आहे. मुला-मुलीच्या लग्नासाठी आपण खूप खर्च करतो. मात्र मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करणारा बाप हा खरा बहादूर आहे. जो सर्वांवर प्रेम करतो तो देव. देव मिळणं सोपं आहे, मात्र आनंद मिळणं अवघड आहे.

संत तुकोबाराय म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या खास शैलीत लक्ष्मणदास काळे महाराजांनी कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रखर विचार पोहोचवले. त्यानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, शेखर चिंचोळकर, राजू तुराणकर, प्रदीप मुक्के, दीपलाल चौधरी, अरविंद क्षीरसागर, ज्ञानेश्वर भोंगळे, राहुल चौधरी, कवडू दुरुतकर, रमा क्षीरसागर, कलावती क्षीरसागर, राजेश महाकुलकर, राजेंद्र क्षीरसागर, बबन चिंचोळकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रम झाला. आपल्या प्रास्ताविक भाषणातून राजू तुराणकर यांनी संत गाडगेबाबांचा संपूर्ण जीवनपट उभा केला.

गाडगेबाबांच्या संदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती आवश्यक आहे, यावर प्रतिपादन केलं. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी संतांच्या विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, संतांचे विचार प्रत्यक्ष कृतीत येणं आवश्यक आहे. गेल्या 24 वर्षांपासून हा जयंती उत्सव साजरा होतोय. हे खरोखर कौतुकास्पद आहे. असं त्यांनी यावेळी म्हटलं. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारवार यांनी संत गाडगेबाबांच्या कार्य आणि दिशेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी त्यांचे कीर्तन असे ते गाव ते दिवसभर स्वच्छ करीत. रात्रीच्या कीर्तनात ते लोकांच्या मेंदूतील घाण स्वच्छ करत. बाबांच्या प्रबोधनातून समाज घडला. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे म्हणाले की, संत गाडगेबाबांमुळे आज आपण उभे आहोत. समाजाचा संघटन महत्त्वाचं आहे.

अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. जयंती उत्सवाचा भाग म्हणून पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. यात समाजातील मुला -मुलींनी आपल्या कला सादर केल्यात. जयंतीला सायंकाळी संत गाडगेबाबा चौकात महाप्रसादाचं वितरण झालं. तसेच गरजुंना ब्लॅंकेट वितरीत झालीत. संपूर्ण उत्सवाच्या यशस्वीतेसाठी राजू तुराणकर, कैलास बोबडे, संजय चिंचोलकर, उमाकांत भोजेकर, अनील खिरकर, जनार्दन थेटे, स्वप्नील बिहारी, कवडू दुरुटकर, अजय चिंचोलकर. ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजक धोबी समाज सा. सां. संस्थाध्यक्ष राहुल चौधरी, उपाध्यक्ष अनिल खिरकर, सचिव संजय चिंचोलकर सहसचिव सारंग बिहारी कोषाध्यक्ष जनार्दन थेटे, सहकोषाध्यक्ष विनोद चिंचोलकर विजय वाघमारे, ज्ञानेश्वर डोळसकर,भरत बोबडे, रोशन चिंचोलकर, महेश बोबडे, धनराज हिवरकर, प्रशांत पत्रकार, मंगेश चिंचोलकर, सचिन क्षीरसागर, पवन बोबडे, नितीन बिहारी, स्वप्निल बिहारी, दीपलाल चौधरी, राजेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, बाळू तुराणकर, मनोज चिंचोळकर, भास्कर पत्रकार, नरेंद्र क्षीरसागर, सुनील क्षिररसागर, संजय तुराणकर, विनोद वाघमारे, ज्ञानेश्वर भोंगळे, देविदास चिंचोळकर, ओम क्षीरसागर इत्यादींनी परिश्रम घेतले.

Comments are closed.