झरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी गजानन मुंडकर रुजू

तालुक्यातील विविध कामातील भ्रष्टाचार संपविण्याचे मोठे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर आजपासून गजानन मुंडकर रुजू झाले आहे. गटविकास अधिकारी मुंडकर यांची स्वच्छ प्रतिमा असल्याची ओळख असल्यामुळे त्यांना तालुक्यातील विविध योजनेतील विकास कामात होणारा भ्रष्टाचार रोखण्याचे आवाहन आहे.

Podar School 2025

ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते, समाज भवन, चावली, 14 व्या वित्त आयोग अंतर्गत होणारी कामे, वस्तू खरेदी, हायमास्क लाईट खरेदी, आरो प्लांट, जिल्हा परिषद शाळेचे वॉलकंपाउंड बांधकाम व इतर अनेक कामे तसेच पंचायत समिती अंतर्गत शेततळे, सिंचन विहीर, पांदण रस्ते, खनिज विकास अंतर्गत येणारे रस्ते असे अनेक कामे तालुक्यात सुरू आहे. यातील अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार असल्याची व नित्कृष्ठ दर्जेचे कामे करण्यात आल्याची ओरड आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवीन रुजू झालेल्या गटविकास अधिकारी यांना सर्वात जास्त त्रास राजकीय ठेकेदार व पुढाऱ्यांचा होणार हे निश्चित. कारण वरील कामे करणारे सर्वाधिक ठेकेदार हे राजकीयच असल्याने मोठा त्रास सहन करावे लागणार आहे. परंतु स्वच्छ व चांगले काम करणारे लोकांना संधी देऊन तसेच राजकीय दबावाखाली न येता बीडीओ यांनी कार्य करावे अशी अपेक्षा जनतेकडून केली जात आहे.

तालुक्यातील 29 ग्रामपंचायत पैसा खाली येत असून या ग्रामपंचायत करिता वेगळा निधी येतो. परंतु यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याची माहिती असून याबाबत आदिवासी बांधवानी अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती मार्फत होणाऱ्या विविध योजनेतील कामात होणारा भ्रष्टाचार थांबवावा अशी अपेक्षा जनता करीत आहे.

यापूर्वी गटविकास अधिकारी पदाच्या खुर्चीवर प्रभारी म्हणून सुधाकर जाधव यांनी भर सांभाळला. त्यांच्या काळात कोरोना मध्ये चांगल्या पद्धतीने कार्य केले गेले. जनतेच्या आलेल्या प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले व तक्रारीच्या ठिकाणी स्वतः भेट देणे, प्रत्येक ग्रामपंचायतला भेटी, जिल्हा परिषद शाळेत भेटी देऊन त्यांनी आपला कार्यकाळ अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात अग्रेसर होते त्यामुळे अनेकांना ते रुचत देखील नव्हते.

गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सभापती राजेश्वर गोंड्रावार पंचायत समिती सदस्य नागोराव उरवते माजी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव व विस्तार अधिकारी इसलकर यांनी केले.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.